महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील शेतकऱ्यांसाठी 19 मार्चला उपवास - अमर हबीब - अमर हबीब

शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच लाखो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 19 मार्च रोजी लाखो लोक उपवास करणार आहेत.

अमर हबीब
अमर हबीब

By

Published : Feb 21, 2020, 9:51 AM IST

वाशिम - शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच लाखो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 19 मार्च रोजी लाखो लोक उपवास करणार असल्याचे शेतकरी चळवळीतील नेते अमर हबीब यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

शेतकऱ्यांसाठी 19 मार्चला उपवास

सततच्या संकटांमुळे दरदिवशी राज्यात 10 तर देशात 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या राज्याकरिता ही बाब लांच्छनास्पद आहे. मात्र, याकडे केंद्र किंवा राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावेळी भूमिपूत्र संघटनेचे विष्णुपंत भुतेकर, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर,रामेश्वर अवचार यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -'या' निर्णयामुळे १० लाख लोक‍ांवर अन्याय, काका-पुतण्याचे खरे चेहरे जनतेसमोर'

ABOUT THE AUTHOR

...view details