वाशिम - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात बदल करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) रोजी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी संचारबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत.
असे असेल वेळेचे बंधन
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील. प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने आस्थापना बंद राहतील. मात्र, या काळात दूध विक्रेते, डेअरी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानाच वापर करावा. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत सुरू राहील. पण, या मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल.
विविध ठिकाणासाठी व्यक्तींच्या उपस्थितीवर बंधन
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही केवळ एका वेळी 10 व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहणार आहेत. लग्न समारंभात वधू-वरासह केवळ 25 व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी राहील.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल घोषित करणे इत्यादी कामासाठी परवानगी अनुज्ञेय राहील. शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची सिनेमागृह, व्यायामशाळा (जिम) व जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
वाहतुकीसाठी असतील हे नियम