वाशिम - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बाधित लोकांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. आधी बाधित लोकांना मदत करा आणि नंतर यात्रा काढा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी लगावला. शिवस्वराज यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकारच्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसेंची नाराजी - अजित पवार - वाशिम
सरकारने केलेल्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बनवा-बनवी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.
अजित पवार
यावेळी बोलताना पवार म्हणाले, की राज्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी 1 हेक्टरपर्यंत कर्जमाफी करणे, हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
तर सरकारने केलेल्या कर्जमाफीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बनवा-बनवी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली.