वाशिम - अनधिकृत बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागण्यासाठी एका व्यक्तीने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. हा प्रकार मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे घडला. वसुदेव घुगे असे आंदोलनकाचे नाव आहे.
याआधी दिला होता इशारा -
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी याआधी याबाबत चौकशीची मागणी केली. तसेच चौकशी न केल्यास 1 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने आज वसुदेव घुगे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, गावात खासदार निधीतून 6 लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. हा निधी नवसाची देवी येथे खर्च करणे बंधनकारक असताना हे काम शेतकऱ्यांच्या शेतात करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ही वसुदेव घुगे यांनी निवेदनातुन केला.
हेही वाचा -वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार; तळोधी वनपरिक्षेत्रातील घटना
घटनास्थळी पोलीस दाखल -
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच मालेगाव पोलीस आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे वसुदेव घुगे यांनी सांगितले.