महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे धरणे आंदोलन - वाशिम ताज्या बातम्या

संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्या नैतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Sanjay Rathod
Sanjay Rathod

By

Published : Aug 27, 2021, 10:24 PM IST

वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री पद गमावलेले बंजारा नेते संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या नैतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा भरातील बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांच्या समर्थनात घोषणा बाजी करण्यात आली.

प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण -

पुजा चव्हाणने 7 फेब्रुवारी 2020 रोजी वानवडी येथील राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केली होती. मात्र, पूजासोबत राहणाऱ्या अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात जोडले गेले होते. त्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा - corona update - राज्यात ४६५४ नवे रुग्ण, १७० मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details