महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शना नंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह - Sanjay Rathod Poharadevi

महंत यांच्या कुटुंबातील 4 जणांसह आज 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी महंतांचे दर्शन घेतले होते. त्यामुळे, त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

District Hospital Washim
जिल्हा रुग्णालय वाशिम

By

Published : Feb 25, 2021, 6:52 PM IST

वाशिम -पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड हे 23 फेब्रुवारीला शक्ती प्रदर्शन करीत पोहरादेवी येथे दाखल झाले होते. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, तरीही बंजारा बांधव हजारोंच्या संख्येने पोहरादेवीला आल्यामुळे कोरोना वाढणार, ही भीती होती आणि तेच खरे ठरले. 22 तारखेला 30 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये महंत यांच्या कुटुंबातील 4 जणांसह आज 8 जण पॉझिटिव्ह आले.

माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर

हेही वाचा -पोहरादेवी गर्दी प्रकरणी हजारोंवर गुन्हे दाखल; वनमंत्री राठोडांसह महंतांचे नाव नाहीच

महंतांसह 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी महंतांचे दर्शन घेतले होते. त्यामुळे, त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. पोहरादेवी येथील महंत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गावात कोरोना टेस्ट सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

हेही वाचा -धक्कादायक! वाशिमच्या देगावमध्ये निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details