वाशिम - लॉकडाऊनमध्ये दुचाकीवर फक्त चालकाला तर खासगी तीनचाकी व चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि इतर २ अशा एकूण ३ व्यक्तींना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास प्रत्येक व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच वाहन क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास सदर वाहन जप्त करण्यात येणार आहे.
वाशिममध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ जूनपासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीवरून एका व्यक्तीला म्हणजेच चालकाला प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी तीनचाकी व चारचाकी वाहनांमध्ये चालकासोबत इतर २ व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ जूनपासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीवरून एका व्यक्तीला म्हणजेच चालकाला प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी तीनचाकी व चारचाकी वाहनांमध्ये चालकासोबत इतर २ व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा आदी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिले आहेत.