वाशिम - जिल्ह्यात कोरोनासंसर्ग वाढू नये, यासाठी सर्व नागरिकांसह हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारपेठ, पेट्रोलपंप, मंगल कार्यालये यासारख्या आस्थापनाधारकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. दुकाने अथवा आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास, मास्कचा वापर न केल्यास संबंधित ग्राहकासोबतच आस्थापना मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या सभेत ते बोलत होते.
'मालकावरसुद्धा कारवाई'
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, पेट्रोलपंप, लग्न अथवा इतर समारंभ, खेळाची मैदाने यासह सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्ती आढळल्यास संबंधित आस्थापना मालकावरसुद्धा कारवाई केली जाईल.
'त्रिसुत्रीचे पालन होणे आवश्यक'