वाशिम - जिल्ह्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत आहेत. अनेक खासगी डॉक्टर्स परवानगी नसतानाही कोविड सेंटर चालवत असल्याचे समोर येत आहे. वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिटलवर कोविड विनापरवाना कोविड सेंटर चालवल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी कारवाई केली. त्यांनी या हॉस्पिटलला परवाना रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये विनापरवाना कोविड रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही त्या रूग्णालयाला भेट दिली असता, कोरोनाचे 20 रूग्ण आढळून आले. त्यामुळे रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस दिल्याची माहिती डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.