महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून वाशिममध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर होतेय कारवाई

By

Published : Apr 15, 2020, 4:01 PM IST

कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या नागरिकांना 200 रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाशिममध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर होतेय कारवाई
वाशिममध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर होतेय कारवाई

वाशिम - सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या नागरिकांना 200 रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

....म्हणून वाशिममध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर होतेय कारवाई

कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिक विनाकारण मास्क न लावता बाहेर फिरताना दिसत आहेत. म्हणून जिल्हा प्रशासनाने चेहऱ्यावर मास्क न लावता शहरात फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारपासून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकावर कारवाईला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा -कल्याण डोंबिवलीत दिवसभरात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; तर एका रुग्णाला डिस्चार्ज

तर मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांचेही वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यत आली.

ABOUT THE AUTHOR

...view details