वाशिम -राज्यात आजपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांना शहरात फिरून विनाकारण फिरणाऱ्या १० ते १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाशिममध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, वाहनेही केली जप्त - वाशिम पोलीस
देशात कोरोनामुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावी आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, त्यातही कोरोनाचा एकही रुग्ण नसणारे जिल्हे सुद्धा आहे, तर काही ठिकाणी अगदी कमी रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यात ग्रीन, ऑरेंज, रेड असे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग-धंद्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत वाशिम शहरात अनेकजण विनाकारण फिरताना आढळून आले.
वाशिममध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, वाहनेही केली जप्त
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांचे ४३५ वाहने जप्त केली आहेत. तसेच ६०० च्या वर नागरिकांविरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.