वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहराजवळील अमरावती रस्त्यावर शुक्रवारी रात्री चारचाकी आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात ऑटो रिक्षामध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.
ऑटो रिक्षा आणि चारचाकीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जखमी
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षा आणि चारचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटो रिक्षामध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील उपचार आटोपून जामठीवरुन बेळखेडकडे जाणारी ऑटो रिक्षा आणि अकुली स्टॅन्डवरून अकुली गावाकडे येणारी चारचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेमुळे ऑटो रिक्षात बसलेल्या ७ प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. हरिनाथ पांगोळे, आदी विजय पांगोळे आणि श्रीकृष्ण जांभोळे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चारचाकीत बसलेले चार प्रवाशी मात्र, सुखरूप बचावले. या घटनेची बातमी मिळताच आकुली गावातील ग्रामस्थ तत्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. यामुळे गंभीर असलेल्या चौघांना तत्काळ अमरावतीच्या रुग्नालयात दाखल करता आले.