वाशिम- जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे लक्ष काही वेळासाठी विचलित झाले. साधारणत दुसरी किंवा तीसरीत शिकत असेल एवढ्या उंचीचा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येताच अनेक विद्यार्थी त्याकडे एकटक पाहू लागले. हा विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला, तिथे देखील सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षकांना देखील प्रश्न पडला. की हा लहान मुलगा येथे काय करतोय.
...अन् त्याला पाहून सर्वच विसरले दहावीची परीक्षा
निलेश दिसत जरी लहान असला तरी तो दहावीला आहे. त्याची उंची जेमतेम अडीच फूट इतकी आहे.
या छोट्या मुलाचं नाव आहे निलेश डहाणे. निलेश दिसत जरी लहान असला तरी तो दहावीला आहे. त्याची उंची जेमतेम अडीच फूट इतकी आहे. मात्र, त्याचे वय १६ वर्षे आहे. निलेशची शारीरिक वाढ झालेली नाही. त्यामुळे तो चुकून दहावीच्या वर्गात आला की काय? असा पर्यवेक्षकांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे सर्वच पर्यवेक्षकांनी याबद्दल शहानिशा केली. त्यावेळी तो दहावीचाच विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निसर्गत:च निलेशची उंची कमी आहे. त्यामुळे त्यामुळे तो दहावीला आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.