महाराष्ट्र

maharashtra

वाशिम येथे अभिनव उपक्रम, सिट्रोनेला गवतापासून शेतकरी कमवतोय भरघोस नफा

एकदा या गवताची लागवड केल्यानंतर ५ वर्षे याच लागवडीवर उत्पन्न घेता येते. या गवताला कोणतेही जनावर खात नसून, फवारणी व इतर रासायनिक औषधांचा खर्चही येत नाही. गवताची वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करण्यात येते. या कापलेल्या गवतावर शेतात तापत्या पाण्यासोबत प्रक्रिया करून तेल काढण्यात येते. एका एकारात वर्षातून अंदाजे ९० ते १०० किलो पर्यंत तेल काढण्यात येते.

By

Published : Aug 27, 2020, 4:38 PM IST

Published : Aug 27, 2020, 4:38 PM IST

शेतकरी धनंजय गहाणकरी
शेतकरी धनंजय गहाणकरी

वाशिम- पारंपरिक शेतीतून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक प्रयोगशील शेतकरी नवनवीन प्रयोगाकडे वळत आहेत. जिल्ह्यातील कारंजा येथील धनंजय गहाणकरी या शेतकऱ्याने आपल्या ६ एकर शेतीत सिट्रोनेला गवताची लागवड केली असून गवतापासून तेल निर्मिती करून गहाणकरी हे भरघोस नफा मिळवत आहे.

माहिती देताना शेतकरी धनंजय गहाणकरी

धनंजय गहाणकरी हे अडीच वर्षापूर्वी शेतकरी अभ्यास दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी सिट्रोनेला गवताची शेती बघितली. त्यानंतर, गहाणकरी यांनी या शेतीविषयी कृषी विभाग व संबंधित शेतकऱ्यांकडून माहिती घेतली व एक अभिनव प्रयोग म्हणून त्यांनी सिट्रोनेला गवत शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर, कारंजापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठवाडा शिवारातील आपल्या ६ एकर शेतात त्यांनी सिट्रोनेला गवताची लागवड केली. एकदा या गवताची लागवड केल्यानंतर ५ वर्षे याच लागवडीवर उत्पन्न घेता येते. या गवताला कोणतेही जनावर खात नसून, फवारणी व इतर रासायनिक औषधांचा खर्चही येत नाही. गवताची वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करण्यात येते. या कापलेल्या गवतावर शेतात तापत्या पाण्यासोबत प्रक्रिया करून तेल काढण्यात येते. एका एकारात वर्षातून अंदाजे ९० ते १०० किलोपर्यंत तेल काढण्यात येते.

हे तेल उत्तरप्रदेशातील कानपूर, लखनऊ येथील बाजारपेठेत विकल्या जाते. वनस्पती पासून निघणाऱ्या या तेलाला येथे विशेष मागणी असून यापासून आयुर्वेदिक औषधी, तसेच सुगंधी द्रव्य बनविण्यात येते. १००० ते ८०० रुपये किलो प्रमाणे या तेलास भाव मिळत असून वर्षातून ४ वेळा या गवताची कापणी होत असल्याने कमीत कमी उत्पादन खर्चात शाश्वत उत्पन्न या माध्यमातून मिळत आहे.

हेही वाचा-वाशिममधील 136 प्रकल्पांपैकी 60 प्रकल्प 100 टक्के भरले; तुडुंब भरून वाहतोय ऊर्ध्व मोरणा प्रकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details