महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आश्चर्य.. 'ही' म्हैस गावातील कुणावरही अंत्यसंस्कार असूदेत स्मशानात जाते - emotional buffalo

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील गोवर्धन पाटील यांची राणी नावाची म्हैस गेल्या अनेक दिवसांपासून गावात अंत्ययात्रा निघाली की सोबत जाते. संपूर्ण अंत्यसंस्कार उरकेपर्यंत स्मशानभूमीत थांबते. ज्यावेळी गावकरी परत गावात येतात त्यावेळी ती ही परत येते. वनोजा गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ही म्हैस अंत्यविधीला जात असल्यामुळे गावातील नागरिक तिच्या अंगात गावातील आत्मा असल्याचे सांगतात.

राणी म्हैस

By

Published : Sep 18, 2019, 11:51 AM IST

वाशिम- आपण राज्यभरात पाळीव प्राण्यांचे वेगवेगळे विषय किस्से ऐकले आहेत. कोंबडा असो वा मालकाविना दूध घेवून जाणारा सांगलीतील बैल असे अनेक प्राणी आपण बघितले. मात्र, वाशिम जिल्ह्यातील एक चार वर्षे वयाची म्हैस गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला जात असल्याने गावातच नाही तर परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.


मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील गोवर्धन पाटील यांच्याकडे चार म्हशी आहेत. त्यापैकी एक असलेली राणी नावाची म्हैस गेल्या अनेक दिवसांपासून गावात अंत्ययात्रा निघाली की सोबत जाते. संपूर्ण अंत्यसंस्कार उरकेपर्यंत स्मशानभूमीत थांबते. ज्यावेळी गावकरी परत गावात येतात त्यावेळी ती ही परत येते. त्यामुळे गावासह अंत्यविधीला येणाऱ्या पाहुणे मंडळीत ही म्हैस कुतुहूलाचा विषय ठरत आहे.


वनोजा गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ही म्हैस अंत्यविधीला जात असल्यामुळे गावातील नागरिक तिच्या अंगात गावातील आत्मा असल्याचे सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details