महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशीममध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षेकडे ८५७ विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ - वाशिम लेटेस्ट न्युज

वाशीम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात पार पडली आहे. यामध्ये राजस्थान महाविद्यालयात ४३२ मधून २६५ विद्यार्थी हजर होते.

राज्य सेवा परीक्षा
राज्य सेवा परीक्षा

By

Published : Mar 21, 2021, 9:49 PM IST

वाशीम - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२० चा पहीला पेपर रविवार (आज) वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रावर पार पडला. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान तर दुसरा पेपर दुपारी ३ ते ५ दरम्यान झाला. या पहिल्या पेपरला २ हजार ५५३ उमेदवारांपैकी १ हजार ६९६ उमेदवार हजर होते. तर तब्बल ८५७ उमेदवार गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.

वाशीम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात पार पडली आहे. यामध्ये राजस्थान महाविद्यालयात ४३२ मधून २६५ विद्यार्थी हजर होते. तर १६७ गैरहजर असल्याचे पुढे आले आहे. तसेच हॅपी फेसेस हायस्कूल मध्ये ४३२ पैकी २८९ परिक्षार्थी हजर होते. तर १४३ गैरहजर होते. एस. एम. सी. इंग्लिश स्कूल मध्ये ३८४ पैकी २५५ हजर होते. तर १२९ गैरहजर होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण परीक्षा उपकेंद्रावर ८५७ उमेदवार गैरहजर असल्याचे पुढे आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details