वाशिम- राखीव असलेल्या वाशिम मतदारसंघातील माजी आमदार सुरेश इंगळेंसह चार अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेनेचे बंडखोर निलेश पेंढारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने भाजपचे लखन मलिक यांना निवडणूक अवघड जाणार आहे. तर, वंचित आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत येथे होणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून 44 उमेदवार रिंगणात हेही वाचा -एकनाथ खडसे म्हणतात... २४ ऑक्टोबरला सरकार महाआघाडीचेच येणार!
कारंजा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रकाश डहाके यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, वंचित आणि बसपा अशी चौरंगी लढत होणार आहे.
रिसोड मतदारसंघ
या मतदारसंघातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. मात्र, काँगेसचे जेष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोर म्हणून अर्ज मागे घेतला नसल्याने काँग्रेसला जड जाणार आहे. त्यामुळे येथे शिवसेना, काँग्रेस, वंचित आणि अपक्ष अशी चौरंगी लढत होणार आहे.