वाशिम- मोप महसूल मंडळात गुरुवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना या पावसाचा जबर फटका बसला. जवळपास दीड तास कोसळलेल्या या पावसामुळे मोप, कन्हेरी, असोला तसेच बोरखेडी आणि इतर शेजारील गावांमधील किमान 400 हेक्टरहुन अधिक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका; रिसोड तालुक्यात 400 हेक्टर शेतीचे नुकसान - पावसामुळे शेतकरी चिंतेत
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना या पावसाचा जबर फटका बसला. जवळपास दीड तास कोसळलेल्या या पावसामुळे मोप, कन्हेरी, असोला तसेच बोरखेडी आणि इतर शेजारील गावांमधील किमान 400 हेक्टरहुन अधिक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसाने खरडून गेलेली शेती
आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रिसोड तालुक्यात मोप महसूल मंडळातील अनेकांनी दुबार पेरणी केली होती. ती पेरणी ही वाया गेली असून या शेतकऱ्यांवर तीबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनीसह शासनाने मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Last Updated : Jun 27, 2020, 7:05 PM IST