वाशिम - जिल्ह्याच्या पोलीस दलात बदल होताना दिसत आहे. कमीत कमी वेळेत अधिक कामे गतीने पार पडावी, म्हणून वाशिम पोलीस दलाने 30 नव्या बिट मार्शल बाईक खरेदी केल्या आहेत.
गरजू महिलांना होणार मदत -
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते खरेदी केलेल्या या बिट मार्शल बाईकचे उद्घाटन करण्यात आले. दिवसा आणि रात्री गस्तीसाठी खरेदी केलेल्या या 30 बिट मार्शल बाईकमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्याचा विश्वास पोलिसांना आहे. जिल्हा पोलीस दलाचे वाहनांच्या ताफ्यामध्ये नव्याने प्राप्त झालेल्या मोटार सायकल या अतिशय वेगवान आहेत. गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार हे वायरलेसद्वारे प्राप्त कॉलला लवकरात लवकर प्रतिसाद देऊन गरजू महिला, मुली अथवा ज्येष्ठ नागरिक किंवा इतर गरजू व्यक्तीपर्यंत त्वरित पोहचून त्यांना तत्काळ मदत देण्यास उपयोगी होईल.