महाराष्ट्र

maharashtra

वाशिम जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात येताहेत अडथळे

By

Published : Jun 8, 2020, 6:46 PM IST

शासन व पालकमंत्र्यांच्या सूचना देऊनही काही बँका नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली आहे.

शेतकरी कर्जमाफी वाशिम, farmers loan problem washim
farmers loan problem washim

वाशिम- राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकीकरण रखडल्याने जिल्ह्यातील 28 हजार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्यात अडथळे येत आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना हे होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

शासन व पालकमंत्र्यांच्या सूचना देऊनही काही बँका नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज थकित असल्याचे कारण समोर करून या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँकांची नकारघंंटा कायम आहे. नव्याने पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details