महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात अडकलेले १८ मजूर एसटीने छत्तीसगढला रवाना - bus facility for migrant worker

जिल्ह्यात अडकून पडलेल्या छत्तीसगडच्या 18 मजुरांसाठी शनिवारी तहसीलदार अजित शेलार यांनी रिसोड व मालेगांव येथून एसटी बसची व्यवस्था करून दिली. या सर्व मजुरांना मास्क, सॅनिटायझरसह फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत जेवण व पाण्याची व्यवस्था करून देत एसटीतून रवाना करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यातील 18 मजुरांना एसटीने छत्तीसगढला पाठवले
वाशिम जिल्ह्यातील 18 मजुरांना एसटीने छत्तीसगढला पाठवले

By

Published : May 17, 2020, 10:16 AM IST

Updated : May 17, 2020, 11:25 AM IST

वाशिम - कोरोनामुळे वाशिम जिल्ह्यात असलेल्या बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह इतर राज्यातील अडीच हजाराहून अधिक परप्रांतीय मजुरांना जिल्हा प्रशासनाने रेल्वे, एसटी तसेच खासगी बसद्वारे परत पाठविले आहे.

वाशिममध्ये अडकलेल्या १८ मजुरांसाठी एसटी बसची व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागात परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. मात्र, या परिस्थितीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्यामुळे हजारोंच्या संख्येने परप्रांतीयांनी पायदळी घरी परतण्याचा मार्ग पत्करला. अखेर सरकारने त्यांना स्वगृही परतण्याची परवानगी दिली असून यासाठी वाहतुकीची सोयही उपलब्ध करून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अडकून पडलेल्या छत्तीसगडच्या 18 मजुरांसाठी तहसीलदार अजित शेलार यांनी शनिवारी रिसोड व मालेगांव येथून एसटी बसची व्यवस्था करून दिली. या सर्व मजुरांना मास्क, सॅनिटायझरसह फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत एसटीमध्ये बसविण्यात आले. त्यांच्यासाठी बसमध्येच जेवणाचा डबा व पाणी बॉटलसारख्या गरजोपयोगी सुविधांची व्यवस्था करून निरोप देण्यात आला.

Last Updated : May 17, 2020, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details