वाशिम :वाशीम जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज (मंगळवार) वाशीम जिल्ह्यात 218 कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये पशुसंवर्धन विभागातील १७ कर्मचारी व अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजत आहे.
जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांचा मोठा अनुशेष आहे. अशातच १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या विभागाला शासनाने अद्याप विम्याच्या कार्यकक्षेत आणलेले नाही. त्यामुळे अधिकारी , कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात श्रेणी १ चे १७ आणि इतर श्रेणीचे ४१ असे एकूण ५८ दवाखाने आहेत.
एकूण २१८ नव्या रुग्णांची नोंद..
वाशिम शहरातील समता नगर येथील १, नवीन योजना पार्क येथील ३, निमजगा येथील १, कोठेकर वाडी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील १९, पोलीस स्टेशन जवळील १, मंत्री पार्क येथील ३, काटीवेस येथील १, गुरुवार बाजार येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, रमेश टॉकीज जवळील २, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील १, सौदागरपुरा येथील १, शुक्रवार पेठ येथील १, राधाकृष्ण ले-आउट येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १ बाधिताची नोंद झाली आहे.
तर हिवरा रोहिला येथील ३, कृष्णा येथील २, लाखी येथील १, चिखली येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, दगडउमरा येथील १०, ब्रह्मा येथील ६, मालेगाव शहरातील पठाणपुरा येथील १, इतर ठिकाणचे ३, किन्हीराजा येथील १, जऊळका रेल्वे येथील १, मेडशी येथील २, करंजी येथील १, शिरपूर येथील १, देवठाणा येथील १, चांडस येथील १, सोनाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचायत समिती परिसरातील ३, बाबरे ले-आऊट येथील ५, बायपास रोड परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, शहापूर येथील ४, वार्डा फार्म येथील ३, घोटा येथील १, गोगरी येथील १, मंगळसा येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, शिवणी येथील २, पोटी येथील १, मोहरी येथील २, पिंपळखुटा येथील १, चिंचाळा येथील १, जांब येथील १, नवीन सोनखास येथील १, बाधिताची नोंद झाली आहे.
कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संभाजी नगर येथील ३, बाबरे कॉलनी येथील १, संभाजी चौक येथील १, गुरुमंदिर जवळील १, गुंजाटे हॉस्पिटल जवळील १, साई नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, हनुमान मंदिर जवळील १, उंबर्डा बाजार येथील १०, सोमठाणा येथील ३, पोहा येथील १३, लोहारा येथील ४, कामरगाव येथील ९, शिवण येथील १, बेंबळा येथील १, खेर्डा जिरापुरे येथील १, धोत्रा येथील १, पिंप्री मोडक येथील १, रिसोड शहरातील बस डेपो परिसरातील ४, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील २, समर्थनगर येथील १, अयोध्या नगर येथील २, गजानन नगर येथील १, राम नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, गुजरी चौक येथील १, लोणी फाटा येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भर येथील १, गोवर्धन येथील २, घोटा येथील १, चिखली येथील २, वेल्तुरा येथील १, निजामपूर येथील १, मानोरा शहरातील मेन रोड परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गिर्डा येथील २, कुपटा येथील ३, धामणी येथील १, पोहरादेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून, आज ११२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्याची कोरोना आकडेवारी..
- एकूण पॉझिटिव्ह – ११,६४५
- ऍक्टिव्ह – १,२२९
- डिस्चार्ज – १०,२४९
- मृत्यू – १६६