वाशिम - जिल्ह्यातील कारंजा लाड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. हे 16 कर्मचारी कोरोनावर मात करून गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यावेळी त्यांचे पोलीस ठाण्यात फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून पुप्ष देत स्वागत करण्यात आले.
वाशिम : कोरोनावर मात करत 16 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील पोलीस ठाण्यातील 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ते आता आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कारंजा लाड पोलीस ठाण्यातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते. उपचारानंतर ते ठणठणीत बरे झाले आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर आज सेवेत रुजू झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचताच पोलीस ठाण्याचे ठाणेदार व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. टाळ्या वाजवत त्यांचा पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.