महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ११७, २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल - वाशिममध्ये सहा पंचायत समित्यांची पोटनिवडणूका

जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दासमोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे.

117 nominations for 14 groups Washim ZP
वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ११७, २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Jul 6, 2021, 11:58 AM IST

वाशिम - जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ गटांसाठी ११७ तर २७ गणांसाठी १९४ अर्ज दाखल झाले होते. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी होईल की नाही? याबाबत साशंकता वर्तविली जात आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ११७, २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल

सर्वोच्च न्यायालयाने दिले होते पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश -

जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना आली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दासमोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले, आणि पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता.

अर्ज दाखल करण्यासाठी आलेले कार्यकर्ते

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा पडला पाऊस -

त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. २९ जून ते ५ जुलै या दरम्यान उमेदवारी अर्ज झाले असून, शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडला.

हेही वाचा - वंचितची जनविकास आघाडीसोबत युती, जिल्हा परिषद १४ तर, पंचायत समितीच्या 27 जागांसाठी निवडणुक

ABOUT THE AUTHOR

...view details