वाशिम - जिल्ह्यात एकिकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१० ऑगस्ट) ११ नव्या कोरोनाबधितांची नोंद झाली तर ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
वाशिम : ५९ जण कोरोनामुक्त, तर ११ नवे बाधित आढळले - वाशिम कोरोना बातमी
वाशिम जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ११ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
एकाच दिवशी कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १०, पोलीस स्टेशन परिसरातील ६, दामिनी नगर येथल ४, तुषार नगर येथील १, भारतीपुरा येथील २, अशोक नगर येथील ७, शिंदे कॉलनी परिसरातील ३, बायपास परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ३, एम. बी. आश्रम परिसरातील १, कोहिनूर नगर येथील १, रामा सावजी चौक परिसरातील १, संतोषी माता नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, आनंद नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामरगाव येथील १, वढवी येथील १, मोरंबी येथील १, मंगरूळपीर शहरातील शशीमोहन टॉकीज परिसरातील १, सिद्धी नगर येथील १, पठाणपुरा येथील १, चिखली येथील ४, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १, रिसोड शहरातील गणेशनगर येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील २ अशा एकूण ५९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील २, काटीवेश परिसरातील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील १, मुठ्ठा येथील १, मानोरा तालुक्यातील गुंडी येथील १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच अकोला येथे उपचार घेत असलेले वाशिम शहरातील मंगळवार वेस परिसरातील १, धुमका येथील १, रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे सोमवारी निष्पन्न झाले आहे.