वाशिम - तालुक्यातील बोराळा येथील 25 वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित संख्या 11 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 4 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वाशिममध्ये आणखी एका कोरोनाबाधिताची भर, रुग्णांचा आकडा 11 वर - बोराळा कोरोना बातमी
आज (शनिवारी) कोरोनाबधित आढळलेल्या तरुणावर काही दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला होते. मात्र, कोरोनासदृश लक्षणे आढळल्यावर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आज (शनिवारी) कोरोनाबधित आढळलेल्या तरुणावर काही दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला होते. मात्र, कोरोनासदृश लक्षणे आढळल्यावर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 4 जुन रोजी या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. आज त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, या रुग्णाने ज्या खासगी रुगणालयामध्ये उपचार घेतले होते, त्या रुग्णालयाला सील करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात येणार आहेत.