महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' बाजार समितीतील कर्मचार्‍यांना 10 लाखांचे विमा कवच - krushi utpana bazar samiti washim

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांचा विमा काढणारी वाशिम बाजार समितीही विदर्भात एकमेव बाजार समिती असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे व प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

10-lakh-insurance-cover-to-krushi-utpana-bazar-samiti-washim
10-lakh-insurance-cover-to-krushi-utpana-bazar-samiti-washim

By

Published : May 1, 2020, 7:33 PM IST

वाशिम - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून 15 एप्रिलपासून वाशिम कृषी बाजार समितीमध्ये धान्य खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना दरदिवशी अनेक शेतकर्‍यांसोबत संपर्क करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कर्मचार्‍यांना सुरक्षा म्हणून कुटुंबाच्या भविष्याचा विचार करता प्रत्येक कर्मचार्‍यांचा 10 लाखाचा विमा उतरविला आहे.

कर्मचार्‍यांना 10 लाखांचे विमा कवच...

हेही वाचा-तीन तारखेनंतर अधिक मोकळीक मिळणार, निर्बंध शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पण...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांचा विमा काढणारी वाशिम बाजार समितीही विदर्भात एकमेव बाजार समिती असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे व प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details