महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा : लग्नाच्या दोन दिवसआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह.. परिसरात खळबळ - वर्धा गुन्हे बातमी

विष्णु हा रोज सकाळी अरविंद योग साधना शक्ती पीठ, अरविंद आश्रम, हातूरणा येथे योग साधनेसाठी जात होता. 6 जानेवारीला तो शेतात जातो, असे सांगून बेपत्ता झाला.

Wardha
वर्धा

By

Published : Jan 15, 2020, 11:45 PM IST

वर्धा- जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील साहुर येथे तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह त्याचाच शेतात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत बुधवारी आढळून आला. मृत तरुणाचा 8 जानेवारीला विवाह होता. तर तो 6 जानेवारीपासून बेपत्ता होता. कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विष्णू लाड असे मृत तरुणाचे नाव आहे.

वर्ध्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

विष्णु हा रोज सकाळी अरविंद योग साधना शक्ती पीठ, अरविंद आश्रम, हातूरणा येथे योग साधनेसाठी जात होता. 6 जानेवारीला तो शेतात जातो, असे सांगून बेपत्ता झाला. घरी परत न आल्याने शोध सुरू झाला. शेतात जाऊन पाहणी केली असता, त्याची दुचाकी मिळाली. मात्र, तो सापडला नाही. आश्रमात सुद्धा तो सापडला नाही

त्यानंतर विष्णु बेपत्ता झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांत देण्यात आली. मात्र, मिसिंग तक्रारीत 24 तासानंतरच कारवाई होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर 2 दिवसानंतरही विष्णू घरी परत आला नाही. त्यामुळे घातपाताची तक्रार पोलिसात देण्यात आली. अखेर शोधा-शोध केली असता, विष्णुच्याच शेतामध्ये त्याचा मृतदेह कपाशीच्या झाडाजवळ आढळून आला.

पोलिसांनी डॉक्टरांना घटनास्थळी बोलवून मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. त्यानुसार शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण आणि वेळ स्पष्ट होईल. त्यांनतर गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळेल, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details