वर्धा-हिंगणघाटमध्ये एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगणघाटमधील नांदोरा चौकात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
वाचवा...वाचवा...आवाज आला अन्... तिच्यावर पेट्रोल ओतून 'टेम्बा' फेकला - वर्ध्यात तरुणीला जिंवत जाळण्याचा प्रयत्न
महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले.
विजय कुकडे
या घटनेवेळी मनसेचे शाखाध्यक्ष विजय कुकडे हे घटनास्थळावरून जात होते. त्यावेळी अचानक वाचवा...वाचवा..., असा आवाज आला. त्यामुळे कुकडे मागे फिरले तेव्हा एक तरुण हातात टेम्बा आणि पेट्रोल घेऊन दिसला. त्याने मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी येथील स्थानिकांनी धाडस करत तरुणीच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. तसेच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2020, 6:06 PM IST