महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पर्धा परीक्षेतून आलेल्या नैराश्यामुळे तरुणाची पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या

राज्यात एकीकडे स्पर्धा परीक्षेचे घोटाळे गाजत असताना आणखी एका तरुणाने परीक्षेच्या नैराश्यातून आत्महत्या केली. कुटुंबावर आर्थिक संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिट्ठी लिहून आर्थिक मदत करत कुटुंबाची काळजी घ्या, असे लिहून कुटुंबाची माफी मागितली आहे. किशन ढगे, ( Kishan Dhage commits suicide Nagzira ) असे या तरुणाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील आहे.

Young man commits suicide Nagzira
किशन ढगे आत्महत्या नागझिरा

By

Published : Apr 9, 2022, 7:26 AM IST

वर्धा - राज्यात एकीकडे स्पर्धा परीक्षेचे घोटाळे गाजत असताना आणखी एका तरुणाने परीक्षेच्या नैराश्यातून आत्महत्या केली. कुटुंबावर आर्थिक संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिट्ठी लिहून आर्थिक मदत करत कुटुंबाची काळजी घ्या, असे लिहून कुटुंबाची माफी मागितली आहे. किशन ढगे, ( Kishan Dhage commits suicide Nagzira ) असे या तरुणाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील आहे. तो देवळी तालुक्यातील नागझिरा येथे पशुसंवर्धन कार्यलयात परिचारक होता. त्याच ठिकाणी पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -Satellite Pieces Found At Wardha : चंद्रपूरनंतर आता वर्ध्याच्या वाघेडा ढोक शिवरातही सापडले उपग्रहाचे अवशेष

अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत तो एमपीएससीसह स्पर्धा परीक्षेसाठी मागील अनेक वर्षांपासून तयारी करत होता. यासोबत नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. तो देवळी येथे किरायाने राहत होता. तो सातत्याने अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते. याआधी त्याची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणांनी हुकली होती. घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले होते. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरी भरती घोटाळा, तसेच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले.

ही फेसबूक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठली असता तोपर्यंत सर्व संपले होते. पण, फेसबुक पोस्टचे पुढे काय झाले याबद्दल कळू शकले नाही. काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, लक्षात येताच त्याचा मृतदेह काढून पुलगाव रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

किशन याने अनेकदा एमपीएससीची परीक्षा दिली. तो शेवटच्या टप्प्या पर्यंत पोहचलाही. पण, प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून मुलगा अधिकारी व्हावा महणून शिक्षणावर खर्च केला. पण, अपेक्षित नोकरी मिळाली नाही. स्वप्न अधिकारी होण्याचे असताना परिचारक म्हणून काम करावे लागत होते. यामुळे कुठेतरी अधिक नैराश्य आले. हे सगळे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मांडून आपले दुःख व्यक्त केले.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मांडला संघर्ष


प्रति,
मा. पंतप्रधान (मोदी साहेब)
भारत सरकार
मा. मुख्यमंत्री (उद्धवजी ठाकरे)
मा. उपमुख्यमंत्री (अजीतजी पवार साहेब)
महाराष्ट्र शासन

विषय : माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबाबत

अर्जदार: किशन घनश्याम ढगे
मूळगाव - रा भोगाव ता. पालम जि. परभणी
सध्या कामाचा पत्ता : पशुवैद्यकीय दवाखाना नागझरी, ता देवळी जि. वर्धा

Education - BSC (Biotechnology)

महोदय,

वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की, माझ्या घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. तरी तुम्ही माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी.
2012 पासून मी Mpsc अंतर्गत Psi mains 2013, sti mains 2014, psi mains 2016, psi mains 2017 (interview पण दिला), Psi Mains 2018, sti Mains 2016, Aso Mains 2016, 2018 ची मंत्रालय mains त्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेले नैराश्य. माझ्या घरच्यांनी खूप कष्ट करून माझ्या साठी पैसा लावला, माझ्यामुळे होती ती शेती विकली.

आत्महत्या करण्याची कारणे

1) गरिबी, ZP बँकेचे कर्ज, घरची शेती विकली. MPSC करण्यासाठी घेतलेले कर्ज. शिपाई पदावर काम करून मी डिप्रेशनमध्ये जात आहे.

2)बाहेरच्या लोकांकडून माझ्या भावाने घेतलेले कर्ज.

3) उत्पनाचा आर्थिक स्रोत नसणे.

4) दहा वर्षे अभ्यास करून शिपाई पदावर काम करण्यामध्ये मला खूप कमीपणाची भावना निर्माण होत आहे.

5) आरोग्य भर्ती घोटाळा, MIDC परीक्षेत घोटाळा, म्हाडा परीक्षेत घोटाळा, स्पर्धा परीक्षेत होत असलेल्या घोटाळ्यात माझा स्टडी करून दुसरे exam पास करणे असे वाटत नाही. वेळेवर परीक्षा न होणे.

6) MPSC परीक्षा आणि सरळसेवा (स्पर्धा परीक्षेत) आलेले अपयश त्यातून आलेले नैराश्य.

सर्व मा. राजकारणी, समाजकारणी, उद्योगपती, माझे मित्रमंडळी, माझे पाहुणे यांना विनंती आहे की, माझ्या विनंतीला मान ठेवून माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, ही नम्र विनंती.

आपला नम्र

किशन घनश्याम ढगे

माझ्या कुटुंबात माझे आई वडील, भाऊ, भाऊची पत्नी, भाऊला तीन लेकरे आहेत, त्या सर्वांची मी माफी मागतो.

हेही वाचा -Wardha Girl Married With-American Boy : प्रेमाचा वेल अमेरिकेत! वर्ध्याच्या मुलीचा अमेरिकेतील मुलाशी प्रेमविवाह

ABOUT THE AUTHOR

...view details