महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या नादात युवकाचा पडून जागीच मृत्यू - मृत्यू

गाडी चुकल्याचे कळल्यानंतर तुळजापूरजवळ गाडी हळू होणार म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

तुळजापूर येथे चालत्या रेल्वेतून उतरण्याचा नादात युवकाचा मृत्यू १

By

Published : May 18, 2019, 10:34 PM IST

वर्धा - तरुणाला अमरावतीला जायचे होते. परंतु, अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसायचे सोडून तो मुंबई-हावडा-शालिमार एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी चुकल्याचे कळल्यानंतर तुळजापूरजवळ गाडी हळू होणार म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. गजानन डोंगरे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

तुळजापूर येथे चालत्या रेल्वेतून उतरण्याचा नादात युवकाचा मृत्यू

गजानन डोंगरे मुळचा अमरावती जिल्ह्यातील वलगावचा रहिवासी आहे. गजानन हा वर्धेला नातलागला भेटायला आला होता. वर्धा रेल्वे स्थानकावरुन घाई घाईत अमरावती जाण्यासाठी निघाला. मात्र, तो चुकून नागपूरकडे जाणाऱ्या गाडीत बसला. तुळजापूरजवळ त्याला आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आले. रेल्वेची गती कमी होणार याचा अंदाज आला म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एवढ्यात तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

रेल्वेतून प्रवासी पडल्याचे लक्षात येताच गार्डने रेल्वे थांबत कंट्रोलरुमला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details