महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha Year Ender 2021 : कोविड हॉस्पिटल स्थापनेसह 'या' घटनांमुळे वर्धा जिल्हा राहिला चर्चेत - Wardha District Year Ender 2021

माहात्मा गांधीं आणि विनोबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला वर्धा जिल्हा आहे. कोव्हीड 19)पासून जिल्हा अनेक दिवस दूर होता. पण दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला मोठा फटका बसला. वर्षभरात जिल्ह्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. याचाच हा मागोवा

Wardha District Year Ender 2021 : कोविड हॉस्पिटलट्या स्थापनेसह 'या' घटनांमुळे वर्धा जिल्हा राहिला चर्चेत
Wardha District Year Ender 2021 : कोविड हॉस्पिटलट्या स्थापनेसह 'या' घटनांमुळे वर्धा जिल्हा राहिला चर्चेत

By

Published : Dec 30, 2021, 2:14 PM IST

Updated : Dec 31, 2021, 2:51 PM IST

वर्धा- माहात्मा गांधीं आणि विनोबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला वर्धा जिल्हा आहे. कोव्हीड 19)पासून जिल्हा अनेक दिवस दूर होता. पण दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला मोठा फटका बसला. वर्षभरात जिल्ह्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. याचाच हा मागोवा

1) डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये घरवापसीवर्धा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या आणि लोकसंख्येने तसा छोटासा जिल्हा आहे. माहात्मा गांधीजींच्या सेवाग्राममुळे देशातच काय जागतीक पातळीवर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. यातच काँग्रेस पक्षासाठी उर्जास्थान अशी या जिल्ह्याला ओळख आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेस पक्षाने महागाई विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यासाठी सेवाग्राममधूनच पदयात्रा काढली होती. यामध्ये गावकऱ्यांसोबत बसून पटोले यांनी पंगतीत बसून जेवण केले. यादरम्या डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यामुळे भाजपला सोडून गेल्याने भाजपमध्ये युवा सुनील गफाट यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली.

डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये घरवापसी

2) रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून इंजेक्शनच्या सुया निघाल्यासावंगी मेघे रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून इंजेक्शनच्या सुया काढून त्याला वेदनानेतून मुक्ती दिली? यामध्ये महिलेच्या मुलाना जन्म दिला त्याच दिवशी पतीचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे अपशकुनी समजत त्या मुलाला जन्म देणारी आई म्हणजेच सुनेच्या पोटात जाणीवपूर्वक इंजेक्शनच्या टाकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला होता

रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून इंजेक्शनच्या सुया निघाल्या

3) पीपीई किटधारक कर्मचारी मृतदेह नेतानाएप्रिलमध्ये आष्टी तालुक्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याचा तीन दिवस उपचार ही झाला पण अचानक चौथ्या दिवशी सायंकाळी त्याने रुग्णालयातून पळ काढला. त्यामुळे कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून निघून गेल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. अशावेळी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मिळून आला नाही तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रुग्णालयात पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतामध्ये तरंगताना दिसून आला तोच रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीपीई किट धारक लोकांनी तो मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केलेत.

पीपीई किटधारक कर्मचारी मृतदेह नेताना

4) एमआयडीसीमध्ये जेनेटिक लाईफ सायन्सला परवानगी कोरनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकर मायकोसीचा रुग्णाला सर्वाधिक गरज ही एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनची गरज पडत होती. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून सेवाग्राम येथील एमआयडीसीमध्ये जेनेटिक लाईफ सायन्सला परवानगी मिळाली. त्यामुळे काळाबाजार होत असलेंल्या इंजेक्शन जे 20 ते 40 हजारात विकले जातात होते, ते इंजेक्शन या कंपनीने अवघ्या 1200 रुपयात देशभरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर त्याच लॅबमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन घेण्याचीही परवानगी मिळाल्यानंतर त्याचे उत्पादन सुरू झाले आहे.

एमआयडीसीमध्ये जेनेटिक लाईफ सायन्सला परवानगी

5) पालकमंत्री सनील केदार यांनी योजना आखलीसर्वत्र कोव्हीड 19चा प्रभाव वाढत असतांना एकमेव उपाय म्हणून लसीकरण करून घेणे याला प्रशासकीय स्तरावर प्राधान्य देण्यात आले होते. तरी मात्र लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे लोक लसीकरण करण्यासाठी पुढे येत नव्हते. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाचा गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी योजना आखली. यात शहरात वार्ड आणि ग्रामीणमधील गाव सहभाग घेण्यास सांगितले. यामध्ये जो सर्वात पहिले 100% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणार त्याची निवड केल्या जाईल. त्यागावाला किंवा शहरात वार्डला पाच लाख रुपयाचे बक्षीस दिल्या जाईल. हा हे बक्षीस निधी विकास निधी म्हणून त्या गावांना गावासाठी किंवा वार्डासाठी खर्च करण्यासाठी दिला जाणार होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घोषणेला वर्धा जिल्ह्यातील गावांनी हिरीरीने सहभाग घेत लसीकरण टक्केवारी वाढवण्यास प्रयत्न केलेत.

पालकमंत्री सुनील केदार

6) 80 कोटी मिळणार म्हणून आईनेही अंधश्रद्धेपोटी समर्थनपैशाचा पाऊस पडला जाऊ शकतो या मांत्रिकाच्या दाव्यावर विश्वास ठेवला. यात एक तरुणीचे शोषण करण्यात आले. यात तरुणीने सातत्याने होणार्‍या छळाला 80 कोटी मिळणार म्हणून आईनेही अंधश्रद्धेपोटी समर्थन दिले. अखेर पीडित तरुणीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि रामनगर पोलिसात तक्रार दिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अनिस आणि सखी वन स्टॉप सेंटर यांच्य मदतीने पोलिसांनी यात आरोपीना अटक केली.

7) काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळेवर्ध्याच्या मे महिन्यात कोरोनाच्या रुग्ण वाढत असताना निर्बंध लागू केले होते. असे असताना निबंधांमध्ये देवळी मतदारसंघातील नाचणगाव येथे तपासणी शिबिर घेण्यात आले होते. यावरून काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांनी राजकारण करत आहे असे म्हणत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय संघटनेच्या स्तरावरही हा मुद्दा चांगलाच गाजला.

काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे

8) वैशाली सुरेश चंद्र हीवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्तीवर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची घटना मे महिन्यात घडली होती. यामध्ये जिल्ह्याच्या आर्वी येथील वैशाली सुरेश चंद्र हीवसे या महिला अधिकाऱ्यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी नियुक्ती करण्यात आली. आतापर्यंतचा इतिहासबॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची निवड झाली होती. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कन्येला हा मान मिळाला होता. यासोबतच बॉर्डर रोड कन्स्ट्रक्शन कंपनीने इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची एक मोठी जबाबदारी महिला स-शक्तिकरण म्हणून वैशाली यांच्या खांद्यावर दिली होती.

वौशाली हिवसे

9) अखेर त्या चिमुकलीच्या जीव वाचलावर्ध्याच्या सेलू येथे चार वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्याला कुंडल मारून विषारी साप हा तब्बल तास बसला होता. त्या चिमुकलीने धौर्याने तब्बल दोन तास कुठलीही हालचाल न करता तशीच बसून राहिली. हा सगळा घटनाक्रमचा व्हीडीओ थरकाप उडवणार होता. अखेर मध्यरात्री चिमुकलीचा संयम सुटला आणि हालचाल झाली. तेवढ्यातच दोन तासापासून गळ्यात कुंडली मारून बसलेल्या सापाने तीला दंश करत तिथून निघून गेला. गडकरी कुटुंबीयांनी त्या चिमुकलीला लागलीच सेवाग्राम रुग्णालयात नेले. या जीवघेण्या प्रसंगातून डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे अखेर त्या चिमुकलीच्या जीव वाचला

चिमुकलीच्या गळ्याला सापाने वेढा घातला
10 ) आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाडवर्ध्याच्या आर्वी येथील राखीव पोलीस दलाचा जवानांची सुट्टी नाकारल्याने अंधाधुंद गोळीबार करत फरार झाला होता. या घटनेला 29 वर्ष लोटले असतांना आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी त्यावर नजर ठेवत तब्बल 29 वर्षपासून फरार आरोपीला अटक केली. या काळात त्याने नाव बदलवत दुसरा विवाह सुद्धा करून घेतला होता. पण अखेर त्याला जेरबंद करत मोठी कामगिरी आर्वी पोलिसांनी करून दाखवल्याच्या घटना कौतुकास्पद राहिली.

11) अल्पवयीन मुलीवर पतीला अत्याचार करण्यास भाग पाडले वर्ध्याच्या आर्वी डिसेंबर महिन्यातील धक्कादायक घटना म्हणजे पत्नीने पतीवर शंका घेतली. यात शेजारच्या मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरू पत्नीने या अल्पवयीन मुलीवर पतीला अत्याचार करण्यास भाग पाडले. यानंतर पीडित मुलीला धमकी सुद्धा दिली. पीडित मुलीने ही घटना घरी सांगितल्यानंतर पती-पत्नीला आर्वी पोलीसांनी अटक केली.

आर्वी पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेला आरोपी
Last Updated : Dec 31, 2021, 2:51 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details