वर्धा -महात्मा गांधींच्या 151 व्या जयंती निमित्त 'रामधून'ने गांधी जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यासह दिवसभर चालणारी अखंड सूतकताईला देखील सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरगच्च कार्यक्रम नसले, तरीही यंदा सध्या पद्धतीने गांधी जयंतीला आश्रमाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.
वर्धा : गांधी जयंती निमित्त 'रामधून'सह सूतकताईला सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त आज 6.45 ला 'रामधून'ने सुरुवात होत असते. यात आजच्या विशेष दिवसानिमित्त 'रामधून' आश्रम परिसराला लागूनच असलेल्या नई तालीम येथून सुरू होते. या ठिकाणाहून बापू कुटी समोर नागरिक येतात. आजही बापू कुटी समोर बसून प्रार्थना करण्यात आली. 'रघुपती राघव' भजन आणि 'पसायदान' करण्यात आले. यानंतर साफफाईचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
यंदा वर्ध्यातील आश्रमात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत नाहीय. यंदा वर्ध्यातील आश्रमात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत नाहीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. सामाजिक अंतर आणि मास्क घालून नागरिक वावरत आहेत. तसेच आश्रमाच्या वतीने पहिल्यांदाच भाषण मार्गदर्शन होणार नसले तरी महात्मा गांधी यांचे बनारस हिंदी विश्वविद्यापीठ दिलेले पहिले भाषण या ठिकाणी वाचण्यात येणार आहे. 1936 मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदा या ठिकाणी येण्यापूर्वी सेवाग्राम या गावी आले होते. या ठिकाणी देखील त्यांनी लोकांना संबोधित केले होते. हे भाषण आज वाचून दाखवले जाणार आहे.
विशेष दिवसानिमित्त 'रामधून' आश्रम परिसराला लागूनच असलेल्या नई तालीम येथून सुूरू होते. यासह दिवसभर येणाऱ्या काही पदयात्री आणि मान्यवर मंडळींना आश्रमात येता येणार आहे. दिवसभर भजन कीर्तन आणि सूतकताई चालणार आहे. सकाळी 6 वाजता सुरू झालेले सूत यज्ञ दिवसभर चालणार आहे. सायंकाळी प्रार्थनेने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
महात्मा गांधींच्या 151 व्या जयंती निमित्त 'रामधून'ने गांधी जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.