वर्धा -श्रम करणाऱ्या नागरिकांना सन्मान आणि प्रतिष्ठा दिली जात नाही. पण याच व्यक्तीच्या श्रमामुळे देशभर स्वच्छतेचे काम होत आहे. गांधीजींनी त्यांच्या जीवनात श्रमाला विशेष महत्व दिले आहे. याच सेवेचे गाव असलेल्या सेवाग्राममध्ये अशी अमूल्य सेवा देणाऱ्याचे सन्मान गांधीजीच्या 151 व्या जयंती निमित्ताने होत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या विचारावर जयंती साजरी होत असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनी व्यक्त केले.
'महात्मा गांधींच्या विचाराला अनुसरून श्रमिकांचा सत्कार' - वर्धा सेवाग्राम स्वच्छता कामगार सन्मान बातमी
महात्मा गांधीनी दिलेला स्वावलंबनाचा मंत्र श्रमिकांच्या कामाचे जाणीव करून देणार आहे. वर्धा जिल्ह्यातील सुरू झालेला हा उपक्रम देशाला दिशा देण्याचे काम करतील, असे मत माजी जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हे सामाजिक सुधारणाचे केंद्र होते. बापुनीं त्यांच्या जीवनात शौचालय साफ करण्यापासून केस कापन्यापर्यंतचे सर्व कामे केलीत. यामुळे गांधीजी सर्वच कामाला समान सन्मान देत असत. महात्मा गांधींनी श्रमाचे महत्त्व केवळ सांगितलेच नाही तर स्वतःच्या जीवनात उतरवत संदेश देण्याचे काम केले. 'मेरा जीवन ही मेरा संदेश है' असे सांगत केले असल्याचे मत कवी साहित्यिक संजय इंगळे तिगावकर यांनी केले.
महात्मा गांधीजींच्या जयंती सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत त्या होत्या. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञांन संस्थेच्या सभागृहात श्रम प्रतिष्ठा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत देश कष्टकऱ्यांच्या श्रमातून उभा असल्याची जाण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना होती. बौद्धिक क्षमता इतकी प्रतिष्ठा श्रमाला असली पाहिजे. हे गांधीजींनी कृतीतून रुजवण्याचे काम केले. यावेळी स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या 30 जणांचे तसेच 3 संस्थांचे गौरव करण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री सुनील केदार हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. यामुळे त्यांचा संदेश त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी वाचून दाखविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी बौद्धिक श्रमाइतकेच शारीरिक श्रमाला महत्त्व दिले. त्यांना कोण कुठला काम करते यावरून होणार भेद मान्य नव्हता. ते सर्वांच्या कामाला सामान महत्त्व देत. त्यांनी स्वतः हे विचार रुजवण्याचे आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले. आज या श्रमकरी लोकांचा सन्मान करून महात्मा गांधींना खरी आदरांजली वाहतोय, असे वाटत असल्याचे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी संदेशाचा माध्यमातून व्यक्त केले. श्रमिकांचा सन्मान व्हावा ही संकल्पना पालकमंत्री सुनील केदार देणार यांनी मांडली.
हा पहिलाच आगळावेगळा प्रयोग असून या गांधींच्या रचनात्मक कार्याला त्याच्या कर्मभूमीतून सुरवात होत असल्याचा आनंद असल्याचे जिल्हाधिकरी विवेक भिमानवार म्हणाले.
श्रमिकांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या प्रती संवेदनशीलता राखून त्यांच्यासाठी काम करण्याची गरज सामाजिक कार्यकर्ता डॉ. प्रीती जोशी यांनी व्यक्त केली. महात्मा गांधीनी दिलेला स्वावलंबनाचा मंत्र श्रमिकांच्या कामाचे जाणीव करून देणार आहे. वर्धा जिल्ह्यातील सुरू झालेला हा उपक्रम देशाला दिशा देण्याचे काम करतील, असे मत माजी जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हे सामाजिक सुधारणाचे केंद्र होते. बापुनीं त्यांच्या जीवनात शौचालय साफ करण्यापासून केस कापन्यापर्यंतचे सर्व कामे केलीत. यामुळे गांधीजी सर्वच कामाला समान सन्मान देत असत. महात्मा गांधींनी श्रमाचे महत्त्व केवळ सांगितलेच नाही तर स्वतःच्या जीवनात उतरवत संदेश देण्याचे काम केले. 'मेरा जीवन ही मेरा संदेश है' असे सांगत केले असल्याचे मत कवी साहित्यिक संजय इंगळे तिगावकर यांनी केले आहे.
या कर्यक्रमाला जिल्हाधिकारी भिमनवार, नगराध्यक्ष अतुल तराळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बाराहाते, साहित्यिक कवी संजय इंगळे तिगावकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर प्रीती जोशी, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. विजय इंगोले उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिल वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.