वर्धा - वर्धा येथील हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होताना दिसत आहे. या घटनेमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये सकाळी मोर्चा निघाला होता. आता पुन्हा सायंकाळी एक मोर्चा काढत घटनेचा निषेध करण्यात आला. यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर हैदराबादच्या धर्तीवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली.
आरोपीला फाशी द्या अन्यथा हैदरबादच्या धर्तीवर कारवाई करा, हिंगणघाटमध्ये महिलांचा एल्गार - आरोपीला फाशी द्या
हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये सकाळी मोर्चा निघाला होता. आता पुन्हा सायंकाळी एक मोर्चा काढत घटनेचा निषेध करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या (मंगळवार) हिंगणघाट शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. आज काढलेला मोर्चा विठोबा चौक मार्गाने काढण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनला मोर्चा नेण्यात आला. पोलिसांसोबत चर्चा करत काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरात सीसीटीव्ही लावणे, महिला स्कॉड नियुक्त करावे. कायदा सुव्यस्था टिकवून राहण्यासाठी प्रयत्न करावे. शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, रिकामे लेआऊट आदी परिसरात कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संतप्त मोर्चेकखर्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणीही केली. यामध्ये शाळकरी विद्यार्थिनी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.