वर्धा- हिंगणघाट तालुक्यातील खानगावमध्ये एका महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निर्मला सुमित कुरवटकर (वय २४वर्ष) महिलेचे नाव, तर राधिका (वय ४वर्ष), काजल (वय ३वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येची ही घटना बावापूर शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या तिघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या आत्महत्येच्या घटनेबद्दलची अधिकची माहिती अशी की, मुळची यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव(खरडा)ची असलेली ८ ते १० मेढपाळांची कुटुंबे गेल्या दोन महिन्यापासून खानगाव-बावापूरच्या शिवाऱ्यात मेंढ्यापालनासाठी वास्तव्यास आहेत. येथाील शेतकरी महेश ठाकरे यांच्या शेतात त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी कुरुवटकर कुटुंबीयांची एक बैल जोडी जंगल शिवारात भरकटली होती. त्यानंतर आज सकाळी त्या बैलांचा शोध घेण्यासाठी सर्वच महिला रानात गेल्या होत्या. तर पुरुष मंडळी शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रानात गेले होते.