वर्धा -सेवाग्राम येथे रात्री महिलेला विद्युत तारेला धडकून पडलेले लांडोर दिसले. त्या महिलेने त्या लांडोरला पकडले. यावेळी परिसरातील कुत्रे महिलेचा पाठलाग करत होते. मात्र, त्या महिलेने लांडोरला जीवनदान दिले. यामुळे या महिलेचे कौतुक होत आहे. जखमी लांडोरवर पिपल फॉर अॅनिमल्स पिपरी येथील करुणाश्रमात उपार सुरू आहेत.
सेवाग्रामच्या जुनी वस्तीत लांडोर जखमी अवस्थेत आढळून आला. गावातील दारूबंदी पथकाच्या गीता कुंभारे यांना तो दिसला. जखमी असल्याने लांडोर पळत सुटला. लांडोर धावत असतांना त्याच्या मागे कुत्रे लागले. यामुळे कुत्रे लांडोरला खाऊन टाकतील, असे त्यांना वाटले. यावेळी कुत्र्यांना हाकलून लावत काही गावातील युवकांच्या मदतीने त्यानी लांडोरला पकडून जीवनदान दिले. जखमी असल्याने त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, घाबरलेला लांडोर काही प्रतिसाद देत नव्हता. यामुळे याची माहिती गीता कुंभरे यांनी सेवाग्राम पोलिसांना दिली.
गीता कुंभरे यांनी पक्षाला घेऊन सेवाग्राम पोलिस ठाणे गाठले. यावेळी सेवाग्राम पोलिस ठाण्यात कार्यरत आयुब खान यांनी लांडोर पक्षी जखमी अवस्थेत असल्याची माहिती पीपल फॉर अॅनिमल्सचे आशिष गोस्वामी यांना दिली. त्यानंतर पीपल फॉर अॅनिमल्सचे रोहित कंगाले, व्यंकटेश जकाते व कौस्तुभ गावंडे यांनी घटनास्थळी पोहोचून लांडोर पक्ष्याची पाहणी केली.