महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha Crime: धक्कादायक: संशयी पत्नीने पतीस करायला लावला शेजारच्या मुलीवर बलात्कार!

आरोपी पतीने पीडितेवर एकटी असल्याचा आणि पत्नीच्या बोलण्यावरून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर आरोपीची पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग ( provoke to Physical abuse of Minor girl ) पाडले. या घृणास्पद कृत्यानंतर पीडितेला घडलेल्या घटनेबद्दल कोणाला सांगिल्यास जीवानिशी मारण्याची ( Threat after Physical abuse ) धमकी दिली.

वर्धा गुन्हे न्यूज
वर्धा गुन्हे न्यूज

By

Published : Dec 27, 2021, 2:58 AM IST

वर्धा- जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात संशयी वृत्तीच्या पत्नीने पतीला शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Physical abuse of Minor girl ) करावयास लावला. ही धक्कादायक घटना आर्वी पोलीस स्टेशनच्या ( Arvi Police station in Wardha ) हद्दीत घडली. यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून पती-पत्नीला अटक केली आहे.



आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अल्पवयीन पीडिता आणि पती-पत्नी शेजारी राहत होते. 14 वर्षीय अल्पवयीन पीडिता घरात एकटी होती. यावेळी आरोपी महिलेने तिला घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी आली. त्यानंतर महिलेने तिला तू माझ्या पतीसोबत लग्न कर आणि त्याच्याशी संसार कर, असे म्हटले. त्यानंतर ती दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेली. अल्पवयीन मुलीशी पतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयाने हे घृणास्पद कृत्य करावयास लावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा-Kalicharan Controversial Statement : धर्मसंसदेत कालीचरण यांच्याकडून राष्ट्रपित्यांबद्दल अपशब्द, महंत रामसुंदर दास म्हणाले...

डोळ्यादेखत अत्याचार करण्यास केले प्रवृत्त...
आरोपी पतीने पीडितेवर एकटी असल्याचा आणि पत्नीच्या बोलण्यावरून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर आरोपीची पत्नी घरी परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या घृणास्पद कृत्यानंतर पीडितेला घडलेल्या घटनेबद्दल कोणाला सांगिल्यास जीवानिशी मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा-Ajit Pawar Car Driven By LPC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य, पाहा VIDEO

पोलिसांनी गुन्हा दाखल करत केली अटक...
या घटनेनंतर स्वतःची सुटका होताच पीडितेने आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी आर्वी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. तक्रारीची गांभीऱ्याने दखल घेत पती-पत्नी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विविध कलमान्वये गुन्हा ( Wardha Crime ) दाखल केला आहे. दोघांनाही अटक करत पुढील तपास पोलीस

हेही वाचा-Maharashtra omicron update - राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 31, तर कोरोनाचे 1 हजार 648 रुग्ण आढळलेसुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details