वर्धा- पुलगाव येथील एका तीन वर्षीय चिमुकल्या मुलीने एक दौड लावली आणि दोन मोठे रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहेत. आर्या पंकज टाकोने असे या चिमुकलीने नाव असून तिने १००० मीटरचे अंतर ६ मिनिटे १ सेकंदात पूर्ण केले आहे. त्यामुळे तिने इंडिया बुक रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्ड असे दोन विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. हा रेकॉर्ड बनवणारी ती सर्वात लहान खेळाडू ठरली आहे. वर्ध्यातील गांधीजीच्या पुतळ्यापासून सेंट अॅन्थोनी इंटरनॅशनल स्कुलपर्यंतची ही धावण्याची स्पर्धा होती.
कौतु्कास्पद..! तीन वर्षाच्या आर्याने सहा मिनिटात दोन रेकॉर्ड केले नावावर - पुलगावची आर्या
तीन वर्ष तीन महिने वय असलेल्या आर्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यासाठी आठ मिनिटे वेळ देण्यात आला होता. तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी तिला हेच अंतर सात मिनिटात धावायचे होते. पण प्रत्यक्षात चिमुकल्या पावलाने धावत असताना आर्याने त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजेच सहा मिनिट एक सेकंदात हे अंतर पार केले आहे.
तीन वर्ष तीन महिने वय असलेल्या आर्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यासाठी आठ मिनिटे वेळ देण्यात आला होता. तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी तिला हेच अंतर सात मिनिटात धावायचे होते. पण प्रत्यक्षात चिमुकल्या पावलाने धावत असताना आर्याने त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजेच सहा मिनिट एक सेकंदात हे अंतर पार केले आहे. यामुळे तिला दोन रेकार्डवर स्वतःचे नाव कोरता आले. या रेकॉर्डची घोषणा राष्ट्रीय परीक्षक डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली.
आर्याचे वडील पोलीस खात्यात नोकरी करतात. ते स्वत: खेळाडू असल्याने त्यांना खेळात आवड होती. आर्याही नेहमी धावत राहायची हीच गोष्ट हेरून त्यांनी आर्या दीड वर्षांची असल्यापासून तिला धावण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर काही दिवसाच्या सरावानंतर तिचा मैदानावर सराव करून घेतला. त्यातूनच आर्याने आज दोन विक्रम तिच्या नावावर करण्यात यश मिळवले आहे. ते वयाच्या तिसऱ्या वर्षी हे विशेष आहे.
पुढील ध्येय ऑलम्पिकचे...
तिची धावण्याची आवड पाहता वडील पंकज टाकोने यांनी तिला भविष्यात ऑलिम्पिकसाठी तयार करण्याचे ठरवले आहे. यासाठी हळूहळू तयारी करण्यात येईल. मात्र, ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली सर्वात लहान खेळाडू राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.