वर्धा- जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. २ दिवसांपासून पाऊस आणि वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील अनेक भागात थैमान घातले. अशी परिस्थती असताना देखील तापमान ४८ अंशाच्या घरात जाऊन पोहोचले आहे. पाऊस पडल्याने गारवा जाणवेल, असे वाटत असताना तापमान ४७.९ अंश डिग्रीवर पोहोचले आहे.
वर्ध्याने चंद्रपुरला टाकले मागे; तापमान ४७.९ अंशावर - वर्धा
मे महिन्यातच ४६.९ अंश तापमानाने उच्चांक गाठत रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र, ४८ च्या घरात तापमान जाऊन पोहचल्याने अनेक जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.
वर्ध्याचे तापमान हे सरासरी ४४ ते ४५ च्या घरात असते. मे महिन्यातच ४६.९ अंश तापमानाने उच्चांक गाठत रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र, ४८ च्या घरात तापमान जाऊन पोहोचल्याने अनेक जुने रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. स्थानिक बजाज तंत्र कृषी विद्यालय येथे तापमान मोजले जाते. हे तापमान हवामान विभागाला दिले जाते. आज ढगाळ वातावरणान असताना सकाळी सूर्य मात्र तापलेला दिसून आला. दुपारी ३ नंतर तापमानात बदल होताना आज तापमान ४७.९ अंशावर पोहोचले. आजचे हे तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानापेक्षा ०.७ अंशाने जास्त आहे.