वर्धा - यंदाच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे सेलू तालुक्यातील बोर धरणात तब्बल एका दशकानंतर ऑगस्ट महिन्यात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. या कारणाने तीन दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बोर धरण परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात हे धरण 85 टक्के भरले. धरणाच्या बांधकामानुसार आणि पावसाचे पुढील नियोजन पाहता धरणातील पाणी सोडावे लागले आहे. मुख्य कार्यकारी अभियंता एस. सी. राहाणे यांच्या उपस्थित बोर धरणाच्या गेटचे पूजन करून 1, 5 व 9 नंबरचे असे तीन गेट खुले करण्यात आले आहेत. यावेळी उपविभागीय अभियंता यू. बी. भालेराव, सेलूचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पीएसआय सौरभ घरडे, हिंगणी महावितरणचे अभियंता नेवारे, पोलीस पाटील कोकाटे, हिंगणी पोलीस पाटील चचाने उपस्थित होते.