महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीच्या घटनेची तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी चोराला केली अटक

चोरी केलेले सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

वर्धा पोलीस

By

Published : Jul 12, 2019, 12:15 AM IST

वर्धा- मध्यरात्रीनंतर शहरात गस्त सुरू असताना पोलिसांना पहाटे 4 वाजता एक ऑटोरिक्षा चालक दिसून आला. हा रिक्षा चालक चोरी करुन जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला. चंदू गौरीशंकर मिश्रा (वय 28, रा. स्टेशनफैल) असे या चोराचे नावा आहे. चोरीच्या घटनेची तक्रार दाखल व्हायच्या अगोदरच पोलिसांनी चोराला अटक केल्याने त्यांचे शहरात कौतुक होत आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पहाटे 4 वाजताच्या सुमारास एक ऑटोरिक्षा चालक पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी ऑटोरिक्षाची तपासणी केली. रिक्षातील साहित्याबद्दल योग्य माहिती न दिल्याने चालकाला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपी चंदू मिश्रावर चोरीचा गुन्हा दाखल केला आणि मुद्देमाल ताब्यात घेतला.

वर्धा शहर पोलीस

यानंतर सकाळी विजय विधानी नावाचे दुकानदार दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ते तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेले. यावेळी पोलिसानी त्यांना मुद्देमाल दाखवला. विधानी यांनी चोरीला गेलेला माल हाच असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात बाबाराव बोरकुटे, महादेव सानप, सुभाष गावड, गीतेश देवघरे, गंगाधर तांबाडे, विकास मुडे यांनी केली.

चोरीला गेलेले पूर्ण साहित्य जप्त-

यावेळी शहर पोलिसांनी आरोपीकडून 33 मोबाईल, स्मार्ट वॉच, मिक्सर, मिनी इन्व्हर्टर, वॉच, बॉडी स्प्रेसह इतर साहित्य जप्त केले. यावेळी गुन्ह्यात उपयोगात आणलेली ऑटोरिक्षा सुद्धा जप्त करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details