वर्धा - वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातील विविध भागातून चोरी गेलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यात पवनार येथील 24 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून पंकज कवडू डबूरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुचाकी चोरी करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला वर्धा पोलिसांनी केली अटक
शहरातील विविध भागातून चोरी दुचाकी चोरी केलेल्या 24 वर्षीय युवकाला वर्धा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सेलू तालुक्यातील हिंगणीचे राहुल महादेव कोहळे हे कामानिमित्त वर्धेला आले होते. यावेळी जेवायला गेले असताना हॉटेल समोरून अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी पळवली. जेवण करून बाहेर आले असता दुचाकी नसल्याने त्यांनी शोध घेतला; परंतु ती सापडली नाही. अखेर त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या तपासादरम्यान गुन्हे डबी पथकाला पवनार येथील पंकज डबूरकर बद्दल माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी कसून चौकशी केली असता त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली. यावेळी राहुल कवडे यांची एमएच 32 व्ही 0634 तसेच टीव्हीएस मोटर सायकल एम.एच. 32 एक्स 7951, एमएच 31 डब्लू 7186, एमएच 32, बीएल 9223 या चार दुचाकीसह आतापर्यंत एकूण 83 हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, एसडीपीओ पियुष जगताप, शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संजय पंचभाई, सचिन इंगोले, दीपक जंगले, सचिन ढवळे, राजेंद्र ढगे, श्याम सलामे व सुनील मेंढे यांनी केली.