महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राध्यान्य, 'पर्यावरण बचाओ' संदेशासह बाप्पांचे विसर्जन - ganpati visarjan

वर्धा शहरासह आर्वी येथेही नगर पारिषदेकडून पर्यावरण बचाओचा संदेश देत शहरातील विविध भागात कृत्रिम स्वरुपाचे कुंड तयार करण्यात आले आहे. यात गणपती विसर्जन करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकसुद्धा चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.

वर्ध्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राध्यान्य

By

Published : Sep 12, 2019, 6:46 PM IST

वर्धा -शहरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांनी मातीची मूर्ती घेण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसले. तर, आता निरोप देतानाही पर्यावरणपूरक तयार करण्यात आलेल्या हौदात गणपती विसर्जनाला वर्धेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

'सेल्फी विद बाप्पा' पॉईंट


वर्धा शहरासह, आर्वी येथेही नगर पारिषदेकडून पर्यावरण बचाओचा संदेश देत शहरातील विविध भागात कृत्रिम स्वरूपाचे कुंड तयार करण्यात आले आहे. यात गणपती विसर्जन करण्याचे आवाहन केले जात असून नागरीकसुद्धा चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. विशेष म्हणजे नगर पारिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्याकरिता विसर्जन करताना नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा हस्ते 1 प्रमाणपत्र आणि वृक्ष भेट देऊन मोहिमेला हातभारही लावण्यात येत आहे.

हेही वाचा -एकाच घरावर दोन झेंडे? वडील राष्ट्रवादीत, तर मुलगा व सून सेनेत; कार्यकर्ते म्हणतायेत कोणता झेंडा घेऊ हाती?


वर्ध्यातील वरुण पाठक मित्रमंडळीकडून श्रीराम ढोल ताशाची व्यवस्था शहारातील शिवाजी चौकात करण्यात आली. घरगुती गणपती असताना सुद्धा लोकांचा उत्साह कमी होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वर्ध्यातील ऍक्टिव्ह बडी या युवकांच्या संघटनेच्या वतीने शहरातील आर्वी नाका परिसरात कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहे. नागरिकांना बाप्पांसह सेल्फी काढण्याचा वेगळा उपक्रमही राबवण्यात आला. व्हॉट्सअपच्या माध्यमातू बाप्पाशी सवांद साधत सेल्फी काढून निरोप द्या, अशी आगळी वेगळी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न युवकांनी केला असल्याचे ऍक्टिव्ह बडीजचे पवन चांडक यांनी सांगितले.

वर्ध्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राध्यान्य


वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने हनुमान टेकडीवर कृत्रीम हौद तयार करून गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली. गेल्या 5 वर्षांपासून मंचाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. पीओपीच्या आणि मातीच्या मूर्ती वेग-वेगळ्या हौदात विसर्जित करण्यात येत असून सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात, भक्तिभावे पूजाअर्चा करून पुढल्या वर्षी लवकर या म्हणत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

हेही वाचा - नागपूरच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक, भक्त गहिवरले

ABOUT THE AUTHOR

...view details