महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात - खादीचे मास्क इंग्लंडला पाठवणार

महात्मा गांधी हे स्वतः चरख्यावर सूत कातून कापड तयार करत आणि ते परिधान करत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डब्लूएचओने मास्क घालण्याची शिराफस केली आहे. यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कापूस आणि त्यापासून तयार झालेला खादीच्या कापडाला चांगली मागणी आहे. याच खादीच्या कापडापासून मास्क तयार केले जात आहे. हे मास्क इंग्लंडवासियांच्या पसंतीस उतरले आहे. हे मास्क बनवून देण्याचे काम वर्ध्याच्या गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

wardha khadi mask Export to england
वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात

By

Published : Aug 15, 2020, 11:24 AM IST

वर्धा- महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावन स्मृतीने जिल्ह्याला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले आणि सोबतच खादीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खादी हा केवळ कापडच नाही तर गांधींचा विचार आहे. खादीचे महत्त्व स्वातंत्रपूर्व काळापासून आता कोरोनाच्या काळापर्यंत अबाधित आहे. याच भारतीय खादीचे मास्क इंग्लंडवासीयांना पसंतीस पडली आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट..

वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात
महात्मा गांधी हे स्वतः चरख्यावर सूत कातून कापड तयार करत आणि ते परिधान करत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डब्लूएचओने मास्क घालण्याची शिराफस केली आहे. यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कापूस आणि त्यापासून तयार झालेला खादीच्या कापडाला चांगली मागणी आहे. याच खादीच्या कापडापासून मास्क तयार केले जात आहे. हे मास्क इंग्लंडवासियांच्या पसंतीस उतरले आहे. हे मास्क बनवून देण्याचे काम वर्ध्याच्या गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात
स्वातंत्र लढ्यात खादीतून स्वावलंबनाचा दिला धडा -

ग्रामसेवा मंडळाची स्थापना 1934 मध्ये विनोबा भावे यांनी केली. खेड्यात राहणाऱ्या नागरिकांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे कापड तयार करण्याची चळवळ राबवण्यात आली. परदेशी कपडा आणि वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा देण्यात आला. या खादी निर्मितीतून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले. लोकांना स्वावलंबनाचा धडा देण्याचे काम ग्रामसेवमंडळाच्यावतीने करण्यात आले. त्या काळात ग्रामसेवा मंडळाचा डोलारा वाढत असताना गोपुरी परिसरात कामाचा विस्तार करून 1940 मध्ये कामाला गती देण्यात आली. भांडवलशाही न स्वीकारता प्रत्येक हाताला रोजगार मिळेल या तत्वावर काम केले जात आहे.

इंग्लंडमध्ये स्थायीक झालेल्या काही जणांनी खादीचे काम करणाऱ्या ग्रामसेवा मंडळासोबत संपर्क साधला. सुरुवातीला मास्क निर्यातीवर बंदी असल्याने खादीचा कापड निर्यात करून पाठवण्यात आला. कापडापासून मास्क शिवणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीचे नसल्याने त्यांनी मास्क शिवून देण्याची मागणी केली. पण मास्क कसे असावे, यासाठी काही माप ठरवण्यात आले. मास्कची ठराविक लांबी-रुंदी, तीन स्तर, कपडा खराब असू नये, या नियमांचे काटेकोर पालन करून शिवण्यात आले. हे मास्क शिवायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. हे मास्क शिवताना जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. तेच इतर मास्क शिवायला 10 मिनिटे लागत असल्याचे खादीचे शिवणकाम करणारे गणेश खांडस्कर सांगतात.

वर्ध्याच्या खादी मास्कला इंग्लंडमध्ये पसंती; लवकरच होणार निर्यात
इंग्रज भारतात येऊन त्यांनी स्वतःचा कापड विकण्यासाठी इथला कापड उद्योग संपवला. म्हणून भारताला स्वातंत्र मिळवून द्यायचे असेल तर चरख्यापासून निर्मीत खादीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. म्हणून स्वदेशी चळवळ राबवण्यात आली. 'खादी: बगावत का झेंडा' अशा ब्रीदवाक्याचा ग्रामसेवा मंडळाच्या चिन्हात उल्लेख असल्याचे ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करूणा फुटाणे सांगतात.
ऑरगॅनिक खादीचेच मास्क का?
कुठलीच रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने कापूस पिकवला जातो. या ग्रामसेवा मंडळात 'कपास से कपडा' प्रक्रियेतून कापड तयार केला जातो. हा खादीचा कापड शरीरावरचा घाम शोषून घेणारा आहे. याची विशेषतः म्हणजे कपड्याच्या बनावटीमुळे तो श्वास घेण्यास उत्तम आहे. यासोबतच हे मास्क अगदी सहजपणे गरम पाण्यात निर्जंतुक केले जातात. यामुळे या कापडाचे मास्क वारंवार वापरू शकता. यापासून धोका नसून पर्यावरणाला पूरक आहे. या खादीच्या कापडाला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार भावाच्या तुलनेत 20 टक्के जास्त भाव कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो. यातून शिवणकाम, विणकाम करणाऱ्यासह 'कपास से कपडा' निर्माण होताना अनेकांना काम मिळते. यामुळे पुढील काळात खादीला चांगली मागणी मिळाल्यास महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या स्वप्नातला ग्रामसेवा मंडळांच्या स्थापनेचा उद्देश नक्किच साध्य होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details