महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha illegal abortion case : प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करणार, गरज पडल्यास डीएनए चाचणी केली जाईल - पोलीस अधीक्षक

प्रकरणाचा तपास सर्वच अनुषंगाने केला जाणार असून, गरज पडल्यास मिळालेल्या हाडांचे आणि कवट्यांची डीएनए चाचणी सुद्धा करणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ( SP Prashant Holkar on arvi illegal abortion ) यांनी आर्वी पोलीस स्टेशन येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

arvi illegal abortion case
कदम रुग्णालय

By

Published : Jan 13, 2022, 4:52 PM IST

Updated : Jan 14, 2022, 3:47 PM IST

वर्धा -जिल्ह्यातील आर्वी ( Arvi illegal abortion ) येथील बेकायदेशीररीत्या गर्भपात प्रकरणात नव नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकरणाचा तपास सर्वच अनुषंगाने केला जाणार असून, गरज पडल्यास मिळालेल्या हाडांचे आणि कवट्यांची डीएनए चाचणी सुद्धा करणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ( SP Prashant Holkar on arvi illegal abortion ) यांनी आर्वी पोलीस स्टेशन येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा -Video : रुग्णालयाच्या आवारात सापडल्या भ्रूणांच्या 11 कवट्या, 55 हाडे

हाडांचा चाचणी अहवाल लॅबकडून मागवण्यात येणार

या प्रकरणात आरोपी डॉक्टर महिला रेखा कदम ही प्रसुती तज्ज्ञ असली तरी, गर्भलिंग चाचणी ही सासू डॉ. शैलजा कदम यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. तसेच, या प्रकरणात गोबर गॅसच्या खड्यात ज्या पद्धतीने भ्रुणाचे अवशेष आणि हाडांची विल्हेवाट लावण्यात आली यात उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले. यात मिळालेली हाडे हे उपजिल्हा रुग्णालय डॉ. हेमंत पाटील यांच्यामार्फत सील करण्यात आली. यात हाडांचा चाचणी अहवाल लॅबकडून मागवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

डीएनए चाचणी केली जाणार

गुप्त माहितेच्या आधारे रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोबर गॅसच्या खड्ड्यात व्हिलेवाट लावण्याचे समजले. खड्ड्यात 11 कवट्या आणि 55 हाडे मिळून आले असल्याची नोंद जप्त करण्यात आलेल्या रजिस्टरशी जुळत आहे का? हे तपासले जातील. जप्त करण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आठ महिलांचे गर्भपात झाल्याचा डेटा पोलिसांना मिळाला आहे. यात 11 पैकी 8 तेच आहेत का हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यासोबत अधिकच्या तीन कवट्या कोणाच्या आहे? याची नोंद का घेतली नाही?याचा तपास केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले.

अर्भकांची लिंग चाचणी होणार

रजिस्टरवर नोंद असलेले गर्भपात हे लिगल आहे का? अल्पवयीन मुलीचे गर्भपात झाल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला तात्काळ देणे आवश्यक असताना त्याचे उल्लंघन झालेले आहे. ती माहिती का दिली गेली नाही, याचा तपास केला जाणार आहे. यासोबत अर्भकांचे लिंग चाचणी करून ते मेल की, फिमेल होते याचा तपास केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले.

हेही वाचा -Illegal Abortion Case : वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात; सापडल्या भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडे

Last Updated : Jan 14, 2022, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details