महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरांसह दुकान भाड्यासाठी तगादा लावल्यास कारवाई  - जिल्हाधिकारी - vivek bhimnavar news in wardha

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात काम बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. या संकटकाळी भाडे तत्वावर असणारी दुकाने असो अथवा घरभाडे यासाठी मालकांनी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिला आहे.

wardha
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा

By

Published : Apr 20, 2020, 6:59 PM IST

वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात काम बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. या संकटकाळी भाडे तत्वावर असणारी दुकाने असो अथवा घरभाडे यासाठी मालकांनी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी विवेक भीमनावर
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणासाठी राज्यात व जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने, उद्योगधंदे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे कामगार सर्वसामान्य जनतेचा रोजगरावरही परिणाम झालेला आहे. अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. जिल्ह्यात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक असून सध्याच्या आर्थिक संकटामुळे भाडेकरूंना भाडे भरणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने भाडे वसूल न करण्याचे आदेश काढले आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यातील भाडेकरूंना दिलासा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
1 एप्रिल पासून पुढील 3 महिन्याचे घरभाडे मागणीसाठी तगादा लावू नये. या कालावधीत भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूला भाड्याच्या घरातून बाहेर काढू नये असेही आदेशात देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाड्याने घेण्यात आलेली दुकानं जे 250 स्केअरफुटपेक्षा कमी आहे. यांना लॉकडाऊन काळातील एप्रिल महिन्याचे भाडे माफ करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक छोटे दुकानदार व्यासायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details