महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा प्रशासनाने केलेल्या रंगीत तालमीमुळे शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला तर नाही ना? हीच चर्चा - mock drill

जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाने कोरोना विषाणूला लढा द्यायला लागणारी चाचणी रंगीत तालमीच्या माध्यमातून करून घेतली. यामुळे आता प्रशासन आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला तयार असल्याचे शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या रंगीत तालमीमुळे शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला तर नाही ना? हीच चर्चा

By

Published : Apr 10, 2020, 9:00 AM IST

वर्धा-सर्वत्र शांत आणि भीती दायक शहर नसलेले वर्धा शहर आज हादरले. त्याला कारणही तसेच होते. जिल्ह्यात एकही कोरोनाबधित रुग्ण नसला तरी आज ही रंगीत तालीम पाहून धडकी नाही भरली तरच नवल. यात समोर रस्ता मोकळा करून देणारी पोलिसांची गाडी आणि मागे भरधाव सायरन वाजवत जाणारी रुग्णवाहिका...रस्त्या रिकामा करून देतांना रस्त्याचा कडेला थांबलेले वर्धेकर हे चित्र पाहून गावभर एकच चर्चा रंगली... ती म्हणजे कोरोनाचा रुग्ण सापडला.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या रंगीत तालमीमुळे शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला तर नाही ना? हीच चर्चा

जिल्ह्यात एकही रुग्ण तूर्तास आढळला नसला तरी यातून प्रशासनाने कोरोना विषाणूला लढा द्यायला लागणारी चाचणी रंगीत तालमीच्या माध्यमातून करून घेतली. यामुळे आता प्रशासन आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला तयार असल्याचे शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले. यामध्ये पोलीस विभागाचे काम महत्वाचे असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन पासून शांत आणि विरळ गर्दी. फारसे कोणालाही जायला न आवडणारे ठिकाण म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय झाले आहे. पण याच गेटमधून धावनारी पोलिसांची गाडी आणि मागे अंबुलन्स हे कोरोनाचा रुग्ण असल्याची बातमी शहरात पसरायला पुरेशी होती. तसेच चर्चा झाली सुद्धा. याचा हेतू भीती किंवा अडचण पसरवण्याचा नसून केवळ कोरोना परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग किती सक्षम आहे याची जणू चाचणी घेण्यात आली.

याच चाचणीतील दुसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे सेवाग्राम रुगणलायत रुग्ण नेण्याचा. जर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सेवग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना केयर युनिटमध्ये नेण्यात येणार आहे. पूर्व सुचना असल्याने अगोदरच सेवाग्राम प्रशासन सज्ज होते. रूग्णवाहिका पोहचताच तेथील पीईपी वेशातील डॉक्टरांनी स्ट्रेचरवरील व्यक्तीला काळजीपूर्वक उतरवून कोरोना केअर वार्डात दाखल केले. प्रथमिक प्रक्रिया पार पाडत उपचार सुरू केलेत. ही रंगीत तालीम असली तरी या माध्यमातून या आपत्कालीन परिस्थिती काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकारी डॉक्टर यांच्यासाठी महत्वाचा भाग होता. यामुळे आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याचा सराव होऊन गेल्याने अनेक बाबी निदर्शनास आल्या ज्यामध्ये पुढील वेळी सुधारणा केल्या जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details