वर्धा -वर्ध्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस मिळालेल्या मुंडक्याचा आधाराव हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. यात पतीची हत्या पत्नीनेच अल्पवयीन मुलांच्या मदतीने केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यात घरात होणारे वाद आणि मारहाणीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीसह 14 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
पत्नीला अटक करत आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात -पुलगाव शहराच्या रेल्वे पटरीजवळ 6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले शीर मिळून आले होते. त्यानंतर रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी 7 ऑगस्टला मार्ग दाखल केला. या याप्रकरणात पोलीस तपासात ते बेवारस शरीर शीर पुलगाव येथील एका अज्ञात व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मृतकाचा भावानी दिलेल्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यात पत्नीला अटक करत आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मृतक दररोज पत्नीसोबत दारूच्या नशेत करत होता भांडण -मृतक हा मलकापूर बोदड येथील रहिवासी होता. काही महिन्यांपासून तो पुलगावात राहत होता. तेच वृद्ध वडील हे अजूनही मलकापूर येथे वास्तव्यास आहे. मृतक पहिले गृहरक्षक दलात काम करत होता. पण आंदोलनात सहभाग घेतल्याने निलंबित झाला होता. त्यानंतर रोज मजुरी करत दारूचे व्यसनाधीन झाला. त्यामुळे दररोज पत्नीशी वाद घालत होता. तेच मोठा मुलगा दहावीत शिकत असून दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. अखेर दररोजच्या त्रासाचा अंत कारण्याचे ठरवत रागाचा भरात गळा आवळून हत्या केली.