वर्धा Wardha Robbery : वर्ध्यात एक दरोड्याची धक्कादायक घटना घडलीय. सात-आठ जणांच्या टोळक्यांनी घातलेल्या या दरोड्यात तब्बल 55 पोते सोयाबीन व दागिने लुटून नेण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे या वेळी झालेल्या झटापटीत एकाच्या पोटात धारदार शस्त्रानं भोसकल्याची सुद्धा घटना घडली आहे. जखमीला तातडीनं उपचारासाठी नागपूर इथं हलविण्यात आलंय.
फार्महाऊसवर दरोडा टाकून दागिन्यांसह ५५ सोयाबीनचे पोते लंपास, विरोध करणाऱ्या तरुणाच्या पोटात खुपसला चाकू - Wardha Crime
Wardha Robbery : वर्ध्यात रविवारी मध्यरात्री एका फार्महाऊसवर सात ते आठ जणांच्या टोळक्यानं दरोडा टाकलाय. यात 55 पोते सोयाबीनसह दागिने लंपास करण्यात आले आहेत.
Published : Dec 25, 2023, 11:31 AM IST
झटापटीत चाकूहल्ला : नागपूर इथल्या नारायण पालिवाल यांचं वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. त्यांचं पीक व शेतीचं उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेवलेलं असतं. रविवारी रात्री ते आपल्या शेतातील फार्महाऊसवर हजर असताना मध्यरात्री दरम्यान दोन जणांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या मुलानं दरवाजा उघडताच आलेल्या दोघांनी त्यांना धमकावणं सुरू केलं. ही झटापट सुरू असताना आणखी पाच ते सहा जण अचानक तिथं आले. त्यांनी कुटुंबियांना मारण्यास व धमकाविण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊसवर नारायण पालिवाल आणि त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल व हरिकुमारी पालिवाल होते. या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला. त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. तसंच तिथं असलेले 55 पोते सोयाबीनही लंपास केलं. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता.
गाडीतली हवा सोडली मोबाईलही हिसकावलं :पालिवाल कुटूंब हे चारचाकी वाहनानं आपल्या फार्महाऊसवर आले होते. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. तसंच कोणाला संपर्क करु नये, यासाठी त्यांचं मोबाईलसुद्धा हिसकावून नेलं. पण पालिवाल कुटुंबानं मोठं धाडस दाखवून हवा सोडलेल्या वाहनानंच पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. विशेष म्हणजे ज्या मुलावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला, त्याच जखमी मुलानं वाहन चालवत नेलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. कारंजा पोलिसांत 395,397 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Nagpur Hyderabad Highway Robbery : नागपुर-हैद्राबाद महामार्गावर गाडी अडवून लुटली साडेचार कोटींची रोकड; पाच आरोपींना अटक
- Robbery In Jammu Tawi Express : संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवासी जखमी
- Railway Passenger Robbery Case: रेल्वे प्रवाशी महिलेवर कैचीनं वार करून दागिने, मोबाईल पळविणारा चोरटा गजाआड